रत्नागिरी : ईश्वर प्रतिष्ठान हातखंबा (रजि.) आणि मुन्ना देसाई मित्रमंडळ आयोजित श्री केदार (मुन्ना) देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 26/10/2021 रोजी सिद्धीगिरी मंगल कार्यालय, हातखंबा. जि. रत्नागिरी येथे सकाळी 10 ते दु. 02 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे तसेच मोफत नेत्र (डोळे) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आपण दिलेले रक्त आवश्यकतेप्रमाणे तीन जणांचा जीव वाचवू शकते. तरी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून या जीवनदान महायज्ञात सहभागी व्हावे. तसेच गरजूंनी डोळे तपासणी शिबिर आणि सोबत चांगल्या दर्जाचा चष्मा केवळ 200/- मध्ये मिळण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ईश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सचिन (बंधू) शेट्ये आणि मुन्ना देसाई यांनी केले आहे. हे शिबिर कोरोनविषयक सर्व शासकीय नियम पाळून करण्यात येणार आहे. येताना मास्क लावणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सचिन शेट्ये – 9890288200, मुन्ना देसाई – 8411844999, अमित सामंत – 8275455465 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:32 PM 24-Oct-21