रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये २५ ते २७ ऑक्टोबर या काळात इन्फिगोचे सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत रेटिनाच्या रुग्णांची तपासणी करणार आहेत. तिन्ही दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत ते रुग्णालयात उपलब्ध आहेत. मधुमेह अर्थातच रक्तातील अनियंत्रित साखर ही डोळा या महत्त्वाच्या अवयवाचे नुकसान करते. त्यामुळे दृष्टिपटल किंवा रेटिनाला सूज येणे, पडद्यावर रक्तस्राव होणे, पडद्याला छिद्र पडणे यासारख्या समस्या उद्धवतात. रेटिनाच्या तज्ज्ञांकडून मधुमेही रुग्णांनी वर्षातून किमान दोनदा तपासणी करून घेतली तर या समस्या वेळीच लक्षात येतात. अशा समस्यांवर वेळीच उपचार केले, तर रुग्णांचा बराचसा त्रास, पैसा व मधुमेहामुळे होणारा दृष्टीनाश लांबवता येतो किंवा आटोक्यात आणता येतो. कारण मधुमेहामुळे होणारा दृष्टी नाश व डोळ्यांची हानी कधीही संपूर्णपणाने बरी करता येत नाही तर ती वेळोवेळी उपचार करून फक्त नियंत्रणात ठेवावी लागते. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये ग्रीन लेझर, डायमेन्शनल ऑप्टिकल टोपोग्राफी, फिल्ड अॅनालायझर, अर्टली मशीन अशी अत्याधुनिक निदान यंत्रणा असून याद्वारे रेटिनाच्या समस्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने तपासणी केली जाते. हा विभाग रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील एकमेव सुसज्ज विभाग आहे. रेटिना तज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत चेन्नईच्या शंकर ‘नेत्रालयातील उच्च प्रशिक्षित रेटिना तज्ज्ञ आहेत. त्यांनी आतापर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, कोलकाता, चेन्नई, इंदूर, जबलपूर, पटना, रांची, अहमदाबाद, सुरत येथील हजारो रुग्णांवर रेटिनाचे उपचार केले आहेत. त्यांनी २० हजारांहून अधिक डोळ्याच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. त्यांच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी ९३७२७६६५०४ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 25-Oct-21
