रत्नागिरी : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोमवारी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, जिल्हा पोलिसांनी राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी विमानतळ ते गोगटे-जोगळेकर महाविद्यालयापर्यंत सुरक्षा व्यवस्थेची तालीम घेतली. भारतीय इतिहास अनुसंधान परिषद (ICHR), नवी दिल्लीच्या वतीने स्वा. सावरकर यांच्यावर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात केले आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत देशभरात विविध विषयांवर जनजागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रम सुरू आहेत. या अंतर्गत रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा २५ व २६ ऑक्टोबर रोजी आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच गुरू घासीदास विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. अशोक मोडक, महात्मा गांधी आंतरक्षत्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. रजनीश शुक्ला, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष रणजीत सावरकर, आयसीएचआरचे मेंबर सेक्रेटरी प्रा. कुमार रत्नम आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी सोमवार दि. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्यपाल सकाळी ९ वाजता राजभवन मुंबई येथून हेलिकॉप्टरने तटरक्षक दलाचे रत्नागिरी येथील विमानतळावर येणार असून सोमवारी सकाळी ९.३० वाजता राज्यपालांचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे आगमन त्यानंतर सकाळी ९.३० ते १०.३० वाजता या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल कोश्यारी हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी येथील तटरक्षक दलाच्या विमानतळावरुन हेलिकॉप्टरने राज्यपाल मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 25-Oct-21
