संगमेश्वर तालुका भूकंपाने हादरला

0

साडवली : संगमेश्वर तालुक्यात रविवारी सायंकाळी ५ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. अचानक बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू वाशी तर्फ संगमेश्वर सुतारवाडी येथे जमिनीपासून ५ कि.मी अंतरावर होता. या भूकंपाच्या धक्क्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत या भागात कोणती हानी झाल्याचे वृत्त हाती आले नव्हते. दरम्यान, दक्षिण भारतात भूकंपाच्या ३ आणि ४ या अत्यंत महत्त्वाच्या झोनमध्ये रत्नागिरी जिल्हा येत असल्याने या भूकंपामुळे धाकधूक वाढली आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजून ९ मिनिटांनी संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला भूकंपाचे हे केंद्र संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर येथील सुतारवाडी येथे जमिनीपासून ५ मी अंतरावर होता. ४.५ रिस्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का बसला. याची नोंद केंद्रीय सेसमोग्राफी सेंटरच्या वेबसाईटवरसुद्धा झाली आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:20 AM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here