रत्नागिरी : भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेच्या वतीने दि. २५ आणि २६ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वा. सावरकर यांना अभिवादन म्हणून विशेष राष्ट्रीय परिषदेचे आयोजन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात विविध राष्ट्रीय परिषदा, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात अनेक राष्ट्रीय नेते, पुढारी यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर असलेला रत्नागिरी जिल्हाही यात मागे नव्हता. रत्नागिरीचे सुपुत्र लो. टिळक यांचे स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान सर्व परिचित आहे. स्वा. विनायक दामोदर सावरकर यांनीही रत्नागिरीसारख्या गावात जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी केलेले विचारमंथन आणि कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, या हेतूने भारतीय इतिहास अनुसंधान परिषद (ICHR), नवी दिल्लीच्या वतीने स्वा. सावरकर यांच्यावरील “DismantlingCasteistLessonsfromSavarkar’s’Essentials ofHindutva”या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते केले जाणार आहे. परिषदेत भारतभरातील वक्ते, विचारवंत स्वा. सावरकर यांचे विचार आणि कार्यावर प्रकाश टाकणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:30 AM 25-Oct-21
