रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे दीपावली प्रदर्शन

0

रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे दीपावलीनिमित्त रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे जे. के. फाइल्स येथील साई मंगल कार्यालयात महिला बचत गट व उद्योगिनींनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन केले आहे. येत्या २७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत प्रदर्शन होणार आहे. त्यातील स्टॉलकरिता महिला बचत गटांनी बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बचत गटातील महिला आणि उदयोन्मुख उद्योगिनी महिलांसाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. महिलांची उद्योग-व्यवसायात प्रगती व्हावी, त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू, उत्पादनास बाजारपेठ मिळावी, याकरिता हे प्रदर्शन उपयुक्त ठरते. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. अनेक महिला बचत गट उभे करून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासह सर्व मदत करण्याचे कार्य श्रीमती प्राची शिंदे करत आहेत. या प्रदर्शनात स्टॉल बुकिंगसाठी रत्नागिरी ग्राहक पेठेच्या प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती प्राची शिंदे यांच्याशी 9764417079 किंवा 9422376224 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:50 AM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here