खेड रेल्वे स्थानकात मोबाईलची चोरी

0

खेड : मडगाव फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनमधून मुंबईतून गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशाच्या सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या मोबाईलची खेड रेल्वे स्थानकात चोरी झाली. ही घटना दि २१ रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. येथील पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस मनोहर राऊत (वय ३०, मुंबई) यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार ही गाडी खेड स्थानकात आली असता अज्ञाताने झोपल्याचा गैरफायदा घेऊन महागडा मोबाईल लांबवला. या प्रकरणी गन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:16 AM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here