चिपळूण : शहरातील रहदारीच्या रस्त्यावर एका ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लांबविले आहे. यामध्ये या महिलेचे एक लाखांहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर शहर परिसरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरटे सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी रेवती बळीराम शिंदे (वय ६५, रा. कावीळ तळी) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रेवती शिंदे व त्यांची मुलगी नूतन या दोघी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वा. च्या सुमारास शहरातील एकवीरा देवीचे दर्शन घेऊन त्याच रस्त्याने पुढे जुना कालभैरव मंदिर मार्गे वेस मारुती मंदिराकडे जात असता दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिराकडून आतल्या बाजूने मोटारसायकलवरून येणाऱ्या दोघांना पाहिले. ते दोघे त्यांच्याजवळ आले. यावेळी त्या बाजूला सरकल्या. दरम्यान, दुचाकीवरील मागच्या बाजूला बसलेल्या एकाने ६५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्राला हात घालून ते खेचून ते भरधाव वेगाने ते दोघे पसार झाले. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:49 AM 25-Oct-21
