देशात २४ तासांत १४,३०६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४४३ मृत्यूमुखी

0

देशात गेल्या 24 तासांत 14,306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 443 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 18762 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 41 लाख 89 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 54 हजार 712 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 67 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांहून कमी आहे. एकूण 1 लाख 67 हजार 695 रुग्णही अद्याप कोरोनावर उपचार घेत आहेत.

देशातील कोरोनाची स्थिती :

एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 41 लाख 89 हजार 774
एकूण कोरोनामुक्त : तीन कोटी 35 लाख 67 हजार 367
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : एक लाख 67 हजार 695
कोरोनामुळे एकूण मृत्यू : चार लाख 54 हजार 712
एकूण लसीकरण : 102 कोटी 27 लाख 12 हजार लसीचे डोस

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:57 AM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here