पोमेंडी येथील बेपत्ता प्रौढाचा मृतदेह आढळला गळफास लावलेल्या स्थितीत

0

रत्नागिरी : शहरानजिकच्या पोमेंडी खुर्द येथील जंगलमय परिसरात घरातून बेपत्ता झालेल्या प्रौढाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली. दिनेश विठ्ठल पवार (४९, रा.पोमेंडी खुर्द, काजरघाटी, बौध्दवाडी) असे गळफास घेतलेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी कोमल दिनेश पवार (३९, रा.पोमेंडी खुर्द,काजरघाटी, बौध्दवाडी) यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, गुरूवारी सकाळपासून ते घरातून बेपत्ता असल्याने त्यांच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तसेच ग्रामस्थ दिनेश पवार यांचा शोध घेत होते. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी पोमेंडी खुर्द येथील जंगलात दिनेश पवार हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक आकाश साळूके व पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवला. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:06 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here