शृंगारतळी : जपान येथे होणाऱ्या ३८ व्या जागतिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप २०२१ या स्पर्धेसाठी भारताचे नेतृत्व करण्यासाठी नीरजा सचिन चव्हाण हिची निवड झाली असून तिने जपानला प्रयाण केले. पाटपन्हाळे ता. गुहागर येथील निवृत्त परिवहन अधिकारी भालचंद्र चव्हाण यांचा पुतण्या सचिन चव्हाण यांची नीरजा ही सुकन्या आहे. तिचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले असून लहानपणापासूनच तिला जिम्नॅस्टिक्सम आवड आहे. जपानमध्ये भरणाऱ्या ३८ व्या जागतिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी तिची भारतातर्फे प्रतिनिधी म्हणून निवड झाली असून त्यासाठी ती नुकतीच जपानला रवाना झाली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:58 PM 25-Oct-21
