रत्नागिरी : तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या महिला कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी रत्नागिरी नगर वाचनालयात झाली. यावेळी महिला शहर कार्यकरिणी जाहीर केली. अध्यक्षपदी शरयू गोताड यांची निवड केली. बैठकीला ओबीसी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष राजीव कीर, शहर अध्यक्ष मुन्ना चवंडे, तेली समाज जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, खजिनदार रुपेंद्र शिवलकर, सुरेंद्र घुडे, प्रवीण रुमडे, दादा ढेकणे, प्रवीण रायकर, प्रिया बंदरकर, रुचा राऊत आदी उपस्थित होते. रघुवीर शेलार यांनी सूत्रसंचालन केले. सभेच्या अध्यक्षा तालुका महिला आघाडीप्रमुख साक्षी रावणंग यांनी मार्गदर्शन करताना ओबीसी महिलांचे एकीकरण करणे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी सरकारला भाग पाडणे का आवश्यक आहे, त्याचप्रमाणे यावर्षी होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींचा रकाना नसल्यास जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला. ओबीसी महिलांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. ओबीसींना शैक्षणिक आरक्षण मिळावे. मागासवर्गीय भगिनींप्रमाणे ओबीसी महिला बचत गट यांना लाभ मिळावा, तसेच शासनाचे ओबीसींना हक्क आणि अधिकार पाहिजे असतील संघटित होणे काळाची गरज आहे, असे सांगितले. यावेळी निवडलेल्या महिला कार्यकारिणीत अरुणा पेटकर, नेहाली नागवेकर उपाध्यक्षा, वर्षा ढेकणे सचिव, प्रणाली रायकर सहसचिव, राजश्री शिवलकर, सत्यवती बोरकर, सुप्रिया रसाळ, सुवर्णा पावसकर, युक्ता राऊत, जान्हवी मयेकर सर्व सदस्या, प्रणाली कुवेसकर कायदेविषयक सल्लागार यांचा समावेश आहे. तनया शिवलकर यांनी आपण सर्व ओबीसी म्हणून एकत्र येऊन काम करुया, असे आवाहन केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:23 PM 25-Oct-21
