भरधाव वेगाने दुचाकी चालवत अचानक ब्रेक लावल्याने अपघात, गुन्हा दाखल

0

चिपळूण : शहरातील ओझरवाडी येथील एका दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने दुचाकी चालवून अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीला अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे. इम्रान चाँदसाब मुल्ला असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, त्याच्या विरोधात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद पोलिस हेड कॉन्स्टेबल सुभाष भुवड यांनी दिली आहे. यानुसार, इम्रान हा आपल्या ताब्यातील दुचाकीने शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरून भरधाव वेगाने जात होता. यावेळी डी.बी.जे महाविद्यालयासमोर आला असता दुचाकीला अचानक ब्रेक लावल्याने गाडी घसरली आणि तो रस्त्याच्या बाजूस जाऊन पडून अपघात झाला. या अपघातात इम्रान हा जखमी झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:11 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here