चिपळूण : राज्यासह कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंगळवारी (दि. २६) मुख्यमंत्री दालनात आयोजित विशेष बैठकीसाठी चिपळूणचे आ. शेखर निकम यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून बोलाविले आहे. त्यामुळे आ. शेखर निकम कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेण्यासाठी आग्रही रहाणार आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी १०.३० वा. मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात अती तत्काळ बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात चर्चा व निर्णय होणार आहे. बैठकीसाठी कोकणातून विशेष बाब म्हणून आ. शेखर निकम यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून नियोजित या बैठकीला कृषी विभागाचे मंत्री दादा भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, उत्पादन शुल्क व सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, राज्य उत्पादन शुल्क, कृषी विभाग यांचे आयुक्त, फलोत्पादन व पणन विभागातील संचालक, कृषी व अन्न प्रक्रिया कृषी आयुक्तालयाचे संचालक, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. टिश्यू प्रोजेक्ट फेडरेशन लि.चे अध्यक्ष यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. यावेळी आ. निकम यांच्याकडून संबंधित विभागाच्या आयुक्त व सचिवांमार्फत कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय तसेच काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध काजूवरील आधारित उत्पादन प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जाण्याचा आग्रह केला जाईल.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
2:25 PM 25-Oct-21
