महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षांपासून विकास नव्हे फक्त भ्रष्ट्राचार करत आहे. हे सरकार इतकं लबाड आहे की काही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतं. मी तर असे म्हणेल की, यांच्या बायकोनं मारलं तरी यात केंद्राचा हात आहे असं म्हणतील, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर केली. ते नांदेडमधील कुंडलवाडी येथे देगलूर पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.मागील दीड वर्षांत राज्याने अनेक नैसर्गिक संकटं पाहिली. वादळं, महापूर, अतिवृष्टी यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं. याची झळ राज्यातील शेतकऱ्यांना बसली. पण या शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसेही व्यवस्थित दिले गेले नाही. हे सरकार लबाड आहे. काहीही झालं की केंद्राला जबाबदर धरतं, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
3:14 PM 25-Oct-21
