सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेची भूमिअभिलेखकडून मोजणी

0

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील तिवंदामाळ-वाटूळ येथे प्रस्तावित असलेल्या राज्य शासनाच्या सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलकरिता आवश्यक जागेची शासकीय मोजणी गुरुवारी करण्यात आली. या हॉस्पिटलसाठी आ. राजन साळवी यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. या ठिकाणच्या सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी पाच एकर जागा देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच घेतला होता. त्या अनुषंगाने तिवंदामाळ-वाटूळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची पाच एकर जागा महसूल आणि वनविभागास हस्तांतरित करण्यात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागासह आरोग्य, महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या हॉस्पिटलसाठी पाच एकर जागा त्यानंतर आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्याची शिफारस करण्यात आली होती. गुरुवारी या जागेची मोजणी करण्यात आली. त्यावेळी जि.प. माजी सभापती शरद लिंगायत व इतर उपस्थित होते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:21 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here