चिपळूण : शहरालगतच्या वालोपे भोजवाडी येथे एका मानसिक रुग्ण असलेल्या महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. स्नेहल शेखर कोलगे (वय ४५) असे या महिलेचे नाव असून तिचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत शेखर कोलगे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना दि.२२ रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. स्नेहल या अनेक दिवस मानसिक आजाराने त्रस्त होत्या. पेटवून घेतल्यानंतर त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:38 PM 25-Oct-21