टी-२० वर्ल्डकप: पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमनं सांगितलं भारताविरूद्ध सामन्यातील विजयाचं कारण

0

पाकिस्तानविरुद्धची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची विजयाची मालिका अखेर रविवारी खंडित झाली. पण, पाकिस्तानचा संघ इतक्या वाईट पद्धतीनं टीम इंडियाला पराभूत करेल, असे कुणाच्या ध्यानी मनी ही नव्हतं. शाहिन शाह आफ्रिदीनं दिलेल्या धक्क्यातून विराट कोहली व रिषभ पंतनं टीम इंडियाला सावरलं. पण, खेळपट्टीचा रोख पाहता भारतीय गोलंदाजांना १५१ धावांचा बचाव करणं, सोपं नव्हतं. मात्र, त्यांन एकही विकेट घेता आली नाही ही खरी शोकांतिका ठरली. पाकिस्ताननं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतावर पहिला विजय मिळवला. यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आजम यानं हा संघाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. “हा आमच्या संघाचा प्रयत्न होता आणि सुरूवातीच्या विकेट्स आमच्यासाठी मदतीच्या ठरल्या. यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आणि आमच्या फिरकीपटूंची कामगिरीही चांगली होती,” असं बाबर आजमनं सांगितं. “आम्ही ठरवलेल्या गोष्टी केल्या आणि त्याचे परिणाम आम्हाला दिसून आले. आम्ही एक चांगली पार्टनरशिप केली आणि विकेट चांगली होत होती, त्यामुळे आम्हाला अखेरपर्यंत फलंदाजी करायची होती आणि आम्ही तेच केलं,” असंही तो म्हणाला. “हे सोपं नसेल, कारण आम्ही भारताचा पराभव केला आहे. आमचा आत्मविश्वास वाढला असला तरी हा केवळ एकच सामना आहे. अजूनही खुप मोठा पल्ला गाठायचा आहे. आम्ही चांगली तयारी केली होती आणि यापूर्वीचा सामन्यांचा इतिहास आम्ही डोक्यात येऊ दिला नाही. आम्हाला गुणवत्तापूर्ण ट्रेनिग आणि वॉर्मअप मॅचेसची गरज होती. आम्ही देशांतर्गत सामने खेळलो आणि त्या सामन्यांमुळे आम्हाला अधिक आत्मविश्वास मिळाला,” असंही आजमनं सांगितलं.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:02 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here