मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक संपन्न

0

मुंबई : मतदारांच्या हक्कावरून वादग्रस्त ठरलेली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक रविवारी पार पडली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत ३४ पैकी ३१ मतदारांनी मतदान केले. २९ मते मिळवून शरद पवार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. या निवडणुकीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. रविवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. साधारण सभेसाठी विद्या चव्हाण, प्रभाकर नारकर, शशी प्रभू, अरविंद सावंत, प्रदीप कर्णिक, अमला नेवाळकर व भालचंद्र मुणगेकर असे सात सदस्य निवडून आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:20 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here