मांजरे येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

0

संगमेश्वर : तालुक्यातील मांजरे बौद्धजन स्थानिक कमिटीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन कमिटीचे अध्यक्ष सिद्धार्थ लक्ष्मण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध विहारात उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर सामुदायिक त्रिसरण पंचशील घेण्यात आले व सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी कमिटीचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव, श्रीधर जाधव व अनंत जाधव यांनी विचार मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो दलित बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन समाजबांधवांचे आयुष्य प्रकाशमान केले. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यामुळेच समाजाला आपली प्रगती करता आली. त्यामुळे बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी रामजी जाधव, बाळकृष्ण जाधव, धार्मिक जाधव, सुदेश जाधव, अनिल जाधव, प्रकाश जाधव, आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा स्मिता जाधव, सुकेसिनी जाधव, सुगंधा जाधव, वर्षा जाधव आदी उपस्थित होते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:58 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here