आरे गावात जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

0

गुहागर : तालुक्यातील आरे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये आमदार स्थानिक कार्यक्रमाअंतर्गत आरे कोलवठार येथे पाखाडी बांधणे (अंदाजपत्रकीय रक्कम ५ लाख), १५ वा वित्त आयोग कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत ग्रामपंचायत आरे वाकी येथील रमाकांत भोसले घर ते आरे मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (अंदाजपत्रकीय रक्कम ७ लाख), आरे भंडारवाडा दशरथ भोसले घर ते राम मंदिर येथे बंदिस्त गटार बांधणे (अंदाजपत्रकीय रक्कम २लाख) या विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रमानंतर श्रीदत्त मंदिर आरे येथे जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी तालुकाप्रमुख सचिन बाईत, गुहागर पंचायत समितीचे उपसभापती सीताराम ठोंबरे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, विनायक मुळे, सरपंच श्रीकांत महाजन, समीत घाणेकर, उपतालुकाप्रमुख स्वप्निल भोसले, आरे शाखाप्रमुख लह सुर्वे, प्रशांत भोसले, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ कलझुणकर, विजिता देवकर, विभागप्रमुख शरद यादव, उपविभागप्रमुख योगेश धामणस्कर, उपअभियंता वैभव चौधरी, मंदार छत्रे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:56 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here