तुरळ-चिखली रस्त्याची बांधकाम विभाग साफसफाई करणार

0

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-चिखली रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत धोकादायक ठरत होते. दोन दिवसात ही साफसफाई बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येईल, असे आश्वासन सहायक कार्यकारी अभियंता पी. आर. इंगवले यांनी रिक्षा संघटनेला दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. साफसफाई करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने गांधीगिरी करत रिक्षा संघटनेच्या वतीने बांधकाम विभागास स्वखर्चाने श्रमदानातून ही साफसफाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. याच्या शुभारंभास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना रिक्षा संघटनेमार्फत निमंत्रित करण्यात आले होते. रिक्षा संघटनेच्या या गांधीगिरीची अखेर बांधकाम विभागाने दखल घेतली असून ही झाडी आता बांधकाम विभाग साफ करणार आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:17 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here