ना. उदय सामंतांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले; आठ दिवसात जलतरण तलाव सुरू करण्याच्या दिल्या सूचना

0

◼️ उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतांनी दाखवलेल्या तत्परतेचे जलतरणपटूनी केले कौतुक

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी : कोरोना काळातील निर्बंधामुळे बंद झालेला जलतरण तलाव जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचना जारी होऊनही केवळ क्रीडा अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे सुरू होत नव्हता. यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंचे प्रचंड नुकसान होत होते. इतर जिल्ह्यात जलतरण तलाव सुरू होऊन तेथे जलतरणपटू सराव देखील करू लागले होते. अगदी जवळच्या सिंधुदुर्ग मध्ये देखील जलतरण तलाव सुरू झाला आहे. या सर्व परिस्थिती बाबत रत्नागिरी खबरदार ने वृत्त प्रसिद्ध करून खेळाडूंचे म्हणणे मांडले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दुरदृश्य प्रणालीद्वारे मिटिंग घेतली. या मिटींगला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद जोशी, नित्यानंद भुते, चंदन खानविलकर, जलतरण प्रशिक्षक महेश मिलके, आदी उपस्थित होते. या मीटिंगमध्ये जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची मानसिकता पाहून ना. उदय सामंत यांनी त्यांना चांगलेच खडसावले. येत्या आठ दिवसात कोणत्याही परिस्थितीत जलतरण तलाव सुरू करण्याच्या सूचना ना. उदय सामंत यांनी दिल्या. तसेच शहराच्या खालील भागात एक नवीन जलतरण तलाव होणार असून त्याचे काम देखील लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना ना. सामंत यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या. ना उदय सामंत यांनी दाखवलेल्या या रोखठोक भूमिकेचे जलतरण असोसिएशनने कौतुक केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धा तोंडावर असताना आता ना. सामंत यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आता स्पर्धकांना जलतरण तलाव उपलब्ध होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:59 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here