दिलासादायक : जिल्ह्यात आज अवघा 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला

0

रत्नागिरी : आज आलेल्या कोरोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात अवघा एक रुग्ण सापडला आहे. मागील काही महिन्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत असताना सोमवारी अवघा एकच रुग्ण सापडला असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आज करण्यात आली आहे. जिल्ह्यात 24 तासात 16 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 149 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.61 टक्के आहे. नव्याने 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 820 इतकी झाली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.13 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 107 तर संस्थात्मक विलगिकरणात 94 रुग्ण उपचार घेत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:40 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here