टीम रत्नदुर्ग माउंटेनिअर्सनी घेतली स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक अध्यक्ष रणजीत सावरकर यांची सदिच्छा भेट

0

रत्नागिरी : टीम रत्नदुर्ग माउंटेनिअर्सनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक अध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, सचिव श्री. राजेंद्र वराडकर, वरिष्ठ पत्रकार टाइम्स ऑफ इंडिया चे माजी संपादक, बीजभाषक केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुलकर, जे एन यु विद्यापीठाचे प्राचार्य श्री. उमेश कदम व टीम रत्नदुर्ग माउंटेनिअर्स चे पदाधिकारी उपस्थित होते. टीम रत्नदुर्ग माउंटेनिअर्स ला अलीकडेच वीर शिखर सावरकर पुरस्कार घोषित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांनी टीम रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे व त्यांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले व मोलाचे मार्गदर्शन ही केले. सामाजिक उपक्रम व गिर्यारोहण या विषयी मिळालेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल व कालच्या गडबडीत दिलेल्या एक तासाच्या मोलाच्या वेळेबद्दल टीम रत्नदुर्ग माउंटेनिअर्स अध्यक्ष श्री. विरेंद्र वणजु यांनी सर्व वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले व टीम रत्नदुर्ग माउंटेनिअर्स कडून असेच समाज उपयोगी कार्यक्रम व रेस्क्यू ऑपरेशन अजून उस्फुर्त पणे होत राहतील, असे वचन ही देण्यात आले. या वेळी टीम रत्नदुर्ग कडून श्री विरेंद्र वणजु, श्री पराग सुर्वे, श्री गौतम बाष्टे, श्री जितेंद्र शिंदे, श्री किशोर सावंत, श्री हर्षल गांधी, श्री शैलेश नार्वेकर उपस्थित होते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here