भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती सप्ताह आजपासून

0

रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील ग्रामपंचायत, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना येथे भ्रष्टाचार निर्मलन बैठका, शाळा व महाविद्यालयामध्ये व्याख्यान, चर्चासत्र, निबंध स्पर्धा, पथनाट्य, योग वर्ग, व्यायाम शाळा व ज्येष्ठ नागरिक यांचे चर्चासत्र आदी कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, कोणीही शासकीय/निम शासकीय अधिकारी/कर्मचारी लाच रक्कमेची मागणी करीत असल्यास त्या अनुषंगाने acbratnagiri@gmail.com तसेच टोल फ्री नंबर १०६४ व संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:19 AM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here