जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘युवा स्वास्थ्य अभियान’

0

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण करून द्वितीय सत्रापासून महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या हेतूने ‘युवा स्वास्थ्य अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान दि. २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे. रत्नागिरी जिल्हा नॅक समन्वयक डॉ. सरदार पाटील या अभियानाची माहिती देताना म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेले हे अभियान कौतुकास्पद आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज द्वितीय सत्रापासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. दिनेश सुतार आदींचे आभार मानले. डॉ. सरदार पाटील म्हणाले कि, कोकण विभागीय शिक्षण सहसंचालनालयाचे शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली कोकणातील सर्वच जिल्ह्यांकरिता टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये डॉ. ए. एस. साळुखे (मंडणगड तालुका), डॉ. एस. पी. जगदाळे (दापोली), डॉ. आर. जी. जाधव (गुहागर), डॉ. जी. बी. सारंग (खेड), डॉ.एस.एम.गव्हाळे (चिपळूण), डॉ. एन.पी. तेंडोलकर (संगमेश्वर) डॉ. पी. पी.कुलकर्णी (रत्नागिरी) डॉ.ए.एस. कुलकर्णी (लांजा) आणि डॉ. पी. एस. मेश्राम (राजापूर) आदी प्राचार्यांची या अभियानाकरिता कोकण विभागीय सहसंचालनालयामार्फत तालुका समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य विभागदेखील सदर अभियानासाठी पूर्ण क्षमतेने सज्ज झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तसेच जिल्ह्याच्या बाहेर शिक्षण घेणाऱ्या मात्र रत्नागिरी जिल्ह्यात राहणाऱ्या सर्वच पात्र विद्यार्थ्यांनी आणि अध्यापकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक डॉ. सरदार पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने केले आहे. या अभियानांतर्गत १८ ते ४५ वयोगटातील एकही डोस न घेतलेल्या आणि अभियान कालावधीत द्वितीय डोस घेण्यास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्रामुख्याने केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. पात्र विद्यार्थ्यांनी जवळच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:29 AM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here