नारिंगी नदीकिनारी रक्ताचा सडा तसेच मानवी मांसासह बोटांचे तुकडे आढळल्याने खळबळ

0

खेड : तालुक्यातील नारिंगी नदीकिनारी सोमवार दि. २५ रोजी सकाळी सुसेरी नंबर २ या गावात धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. बेपत्ता वृद्धाचा शोध घेणाऱ्या ग्रामस्थांना नदीकिनारी रक्ताचा सडा तसेच मानवी मांसासह हाताच्या बोटांचे तुकड़े आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी पोलिस तपास करत आहेत.
मुंबई येथून नातेवाईकाच्या कार्याला आलेले एक वृद्ध रविवार २४ रोजी रात्री कचरा टाकण्यासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या ओढ्याजवळ गेले. मात्र, त्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत घरी परत आले नाहीत. त्यांच्या मुलाने रात्रीच त्यांचा शोध सुरू केला. मात्र, ते आढळले नाहीत. सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी त्यांच्या नातेवाईकांसोबत शोध सुरू केला असता नारंगी नदीच्या किनाऱ्यावर स्मशानभूमीनजीक ग्रास्थांना मानवी हाताचे तुटलेले बोट आणि रक्त व मांस आढळून आले. दरम्यान, त्यांचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या मुलाने व्यक्त केला. पोलिस पाटील कैलास राईन व ग्रामस्थांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार खेड पोलिसांनी सोमवारी सकाळपासून नदीकिनारी व नदीपात्रात तपास सुरू केला. खेडच्या पोलिस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजितगडदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना नदीच्या पात्रात एक बॅटरी तरंगताना सापडली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सूरी व काही कपडे सापडले आहेत. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले आहे. सुसेरी नंबर २ खालचिवाडी नजीक आढळून आलेल्या माणसाचे मांस व अवयव नक्की कोणाचे याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलिस निरीक्षक निशा जाधव सायंकाळी उशिरापर्यंत सहकाऱ्याना सोबत घेऊन शोध घेण्यास सुरवात केली आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here