‘व्हेल’ची उलटी तस्करी: तीन आरोपींची जामिनावर मुक्तता

0

गुहागर : आंतरराष्ट्रीय बाजारात दोन कोटींहून अधिक किंमत असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करत असताना गुहागर तालुक्यातील वेळंब येथे तिघांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केले होते. या तस्करी प्रकरणी आरोपींच्यावतीने अॅड. संकेत साळवी यांनी काम पाहिले. वेळंब येथे तोफिक अलवारे, अब्दुल मजीद तांबे व चंद्रकांत काताळकर हे सुमारे दोन किलो वजनाची व्हेल माशाची उलटी तस्करीसाठी आणत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर वन विभागाच्या परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती राजेश्री किर यांनी २१ ऑक्टोबर रोजी सापळा रचून तिघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयाने २५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपीकडून जप्त केलेली वस्तू ही व्हेल माशाची उलटीच आहे, असे दाखवणारा कोणताही पुरावा वनाधिकारी समोर आणू शकले नाहीत, असा युक्तिवाद अॅड. संकेत साळवी यांनी केला. गुहागर न्यायालयाने तिन्ही आरोपींना जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:07 AM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here