रत्नागिरी : कोरोना प्रादुर्भावामुळे रेल्वेच्या अनेक गाड्या या विशेष गाड्या म्हणून चालवल्या जात आहेत. यानुसार कोकण रेल्वे मार्गावर आधी मर्यादित कालावधीसाठी जाहीर करण्यात आलेल्या चार गाड्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रेल्वेकडून मुदतवाढ देण्यात आलेल्या गाड्यांमध्ये मडगाव – रत्नागिरी – मडगाव (०१५०२/०१५०१), रत्नागिरी – दिवा (०१५०४/०१५०३), मडगाव -सावंतवाडी (०१५०८/०१५०७) तसेच सावंतवाडी रोड -दिवा (०१५०६/०१५०५) या चार विशेष गाड्यांना दि. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:07 AM 26-Oct-21
