रत्नागिरी : सध्या टी-ट्वेंटी वर्ल्डकपचे वारे वाहू लागले आहेत. रविवारी पाकिस्तान विरुद्ध भारत अशी मॅच झाली. त्यामध्ये पाकिस्तान विजय झाला; मात्र त्याचे पडसाद रत्नागिरीत उमटले. पेठकिल्ला येथील एका युवकाने पाकिस्तानच्या खेळाडूचा स्टेटस ठेवला व भारताचे फलंदाज बाद झाल्यावर आनंद व्यक्त केला. यावर हिंदूप्रेमी संघटना व शिवप्रतिष्ठान या संघटना आक्रमक झाल्या असून भारतात राहून पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या युवकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा पोलिसांकडे केली असून याबाबत वकिलांचा सल्ला घेऊन पुढील पाऊल उचलण्यात येणार आहे. रविवारी झालेल्या या मॅचचे पडसाद रत्नागिरीत उमटले. पाकिस्तानी खेळाडूविषयी आनंद व्यक्त केलेल्या या युवकाविरुद्ध सोमवारी (ता. २५) दुपारी हिंदूप्रेमी संघटना व शिवप्रतिष्ठान या संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांनी संघटनेमार्फत जिल्हा पोलिसांना निवेदन दिले आहे. जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर देशद्रोहाबद्दल कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी २०१७ मध्येही या युवकाने पाकिस्तानच्या बाजूने स्टेटस ठेवले होते. आम्ही कुणाही धर्माच्या विरोधात नाही. आमचे हिंदू-मुस्लिम नाते आहे. आम्ही मुस्लिम बांधवांकडे हक्काने जातो तेही आमच्या सणाला येतात पण एका व्यक्तीमुळे सामाजिक ऐक्य बिघडवायला नको या दृष्टीने या एका व्यक्तीला जर कारवाई झाली तर इतर व्यक्ती अशा गोष्टी करण्यास धजावणार नाहीत. हिंदू राष्ट्रसेनेचे सागर कदम यांनी सांगितले की, रत्नागिरीमध्ये रविवारी त्या व्यक्तीने आनंद व्यक्त केला. पाकिस्तान खेळाडू आफ्रिदीचा फोटो ठेवून समर्थन केलं आहे. भारताच्या एका खेळाडूची विकेट गेली की त्याला आनंद झाल्याचा स्माईलीसह फोटो ठेवला आहे. असे पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या या माणसावर कारवाई ही झालीच पाहिजे, अशी मागणी निवेदनातून संघटनेने केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:15 PM 26-Oct-21
