जिल्हा बँक निवडणूक: उमेदवारी अर्जांवर आक्षेप

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी छाननीमध्येच एकमेकांच्या अर्जातील त्रुटींचा आधार घेऊन आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे छाननी प्रक्रिया सोमवारी (ता. 25) रात्री उशिरापर्यंत सुरु होती. सर्वपक्षीय सहकार पॅनेलविरोधात पंधरा जागांवर अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. बॅकेच्या 21 संचालकांपैकी सहा जागांवर एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. त्यामुळे ते जवळपास बिनविरोध होण्याच्या स्थितीत आहेत. सोमवारी सकाळी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु झाली. सर्वपक्षीय सहकारी पॅनेलमधील 15 उमेदवारांविरोधात अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यातील बहुतांश उमेदवारांनी परस्परांविरोधात आक्षेप नोदवत निवडणुकीपुर्वीच एकमेकाला बाद करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यातील काही कारणेही सहकार क्षेत्रातील अनुभव नाही, उमेदवाराचे सुचक थकबाकीदार असल्याचे आक्षेप आहेत. छोट्या-छोट्या गोष्टींवर आक्षेप घेण्यात आले आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांच्याकडे सकाळपासून सुनावणी प्रक्रिया सुरु झाली होती. सुरवातीला हरकती नोंदवून घेण्यात आल्या आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत छाननीची मुदत होती; मात्र हरकतींची संख्या अधिक असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरु होती. त्यामुळे पंधरा जागांसाठी रिंगणात असलेल्या किती जणांचे अर्ज बाद झाले किंवा किती जणांचे अर्ज ग्राह्य ठरले हे स्पष्ट झालेले नव्हते. आक्षेपांची गर्दी झाल्याने निवडणुकीत उत्सुकता वाढली आहे. या प्रक्रियेवेळी जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष बाबाजी जाधव, अमजद बोरकर, भाजपचे अॅड. दिपक पटवर्धन यांच्यासह सहकार पॅनलमधील गजानन पाटील, सचिन बाईत, चंद्रकांत बाईत यांच्यासह अनेक उमेदवार आपल्या समर्थकांसह उपस्थित होते. दरम्यान, बँक निवडणुकीत सहकार पॅनेलविरोधात रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना ताकद देण्याची जबाबदारी भाजप सरचिटणीस निलेश राणेंनी घेतली आहे. त्याचा प्रत्यय छाननीमध्ये दिसून आला आहे.

HTML tutorial

त्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:31 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here