रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रिक्त असलेल्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सक्रिय सदस्य, नाट्य अभिनेते, नाट्य दिग्दर्शक, नाट्य लेखक डॉ. शशांक पाटील यांची निवड झाल्याबद्दल कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती, मालगुंड यांच्या वतीने अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ‘कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त प्रमुख आदरणीय मधुभाई व विश्वस्त मंडळ, केंद्रीय कार्यकारिणी यांनी दाखविलेल्या विश्वासास आपण नक्कीच आपल्या साहित्यिक कार्यातून सार्थ ठरवत मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांना सोबत घेऊन कोकण मराठी साहित्य परिषदेचा मुळ हेतू साध्य होण्यासाठी प्रयत्नशील असालच हा विश्वास वाटतो’, अशा शुभेच्छा श्री. गजानन कमलाकर तथा आबा पाटील, अध्यक्ष, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती, मालगुंड तसेच जिल्हा मंडळ प्रतिनिधी, कोकण मराठी साहित्य परिषद, जि. रत्नागिरी यांनी दिल्या आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:51 PM 26-Oct-21
