रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांकरिता निबंध, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेसाठी ऑनलाईन शिक्षणाचे फायदे-तोटे, पोस्टर मेकिंगसाठी पावसाळ्यातील रत्नागिरी, वक्तृत्व स्पर्धेसाठी ऑनलाईन मैत्री हे विषय होते. निबंध स्पर्धेत अस्मिता पानगले (तृतीय वर्ष वाणिज्य), अपेक्षा बाणे (तृतीय वर्ष वाणिज्य), स्नेहा कामतेकर (द्वितीय वर्षवाणिज्य) यांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत श्रद्धा आंब्रे (द्वितीय वर्ष कला), वैष्णवी बाणे (द्वितीय वर्ष कला), हेमांगी गोताड (तृतीय वर्ष वाणिज्य) यांनी अनुक्रमे यश मिळवले. पोस्टर मेकिंग स्पर्धेत वैष्णवी बाणे(द्वितीय वर्ष कला), ऋतुजा जाधव (तृतीय वर्ष वाणिज्य), हेमांगी गोताड(तृतीय वर्ष वाणिज्य) यांनी यश मिळवले. प्रा. वैभव घाणेकर, प्रा. अनन्या धुंदूर, प्रा. आसावरी मयेकर, प्रा. सोनाली जोशी, शिक्षक आशिष बापट, सांस्कृतिक विभागप्रमुख वैभव कीर यांनी परीक्षण केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख वैभव कीर यांनी अभिनंदन केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:27 PM 26-Oct-21
