‘आम्ही तुमच्या सोबत आहोत’; बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीतील लोक लपून मेसेज करतात : क्रांती रेडकर

0

मुंबई : क्रुझ ड्रग्स प्रकरणी तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. यादरम्यान, त्यांची पत्नी क्रांती रेडकर हिनंदेखील या प्रकरणावरून पलटवार केला आहे. क्रांती रेडकरनं समीर वानखेडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांवरून प्रत्युत्तर दिलं आहे. समीर वानखेडे केवळ देशसेवा करत आहेत, परंतु त्यांची प्रतीमा मलिन करणं हा आरोपांमागील उद्देश असल्याचं तिनं म्हटलं. “आम्ही तुमच्या सोबत आहोत, स्ट्राँग राहा असं बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोक लपून मेसेज करत आहेत. ते सर्वजण सोशल मीडियावर येण्यासाठी घाबरत आहेत. असं केलं तर आपल्याला यापुढे चित्रपटसृष्टीत काम मिळणार नाही, असं त्यांना वाटतंय. मगरीशी वैर का घ्यावं अशी भीती त्यांच्या मनात आहे,” असं क्रांतीनं यावेळी सांगितलं.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:55 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here