रत्नागिरी : पॅन इंडिया अवेरनेस कैंपेनअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण २७१ स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेमध्ये गट अ आणि गट ब ठेवले होते. ‘समाजातील मुलींचे स्थान आणि सामाजिक भूमिका’ या विषयावर जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलगा-मुलगी भेदभाव समाजातून उच्चाटन करण्यासाठी कल्पकतेतून संस्कार घडवता येतील हाच उद्देश ठेवून सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये छोट्या गटामध्ये सतेज नलावडे याने प्रथम, फरहीन एम. फारूक वाडकर द्वितीय, सोनाक्षी साळवी तृतीय आणि यश पवारने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. मोठ्या गटामध्ये शैलेश शिरगावकरने प्रथम, ऋषभ कोतवडेकर द्वितीय, गायत्री शेलार तृतीय आणि श्रीया शिंगाई हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:09 PM 26-Oct-21
