काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले २९ ऑक्टोबर रोजी लांजा, राजापुरात

0

रत्नागिरी : काँग्रेसचे रत्नागिरी जिल्ह्यातील बदललेले राजकीय वारे पाहता राजापूर विधानसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यासारख्या वाटत आहेत. मागील विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रत्नागिरी दौऱ्यावर येत असून, राजापूर मतदारसंघातील लांजा येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास हजर राहणार आहेत. २९ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्षांचा दौरा निश्चित झाला असल्याचे वृत्त आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले २९ ऑक्टोबर रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसने येऊन चिपळूण स्थानकावर सकाळी ९.४० वाजता उतरून मोटारीने संगमेश्वरकडे जाणार आहेत. सकाळी ११.३० ते दुपारी २ या वेळेत कुणबी भवन पायाभरणी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता संगमेश्वरातून लांजाकडे रवाना होवून सायंकाळी ४ ते ६ या वेळेतील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर कार्यकत्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता लांजातून ते जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या निवासस्थानी प्रयाण करणार आहेत. येथून रात्री ८.३० वाजता निघून रत्नागिरी रेल्वे स्थानकावर येऊन रात्री १० वाजता कोकणकन्या एक्स्प्रेसने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:12 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here