५० हजारांच्या रोकडीसह बॅग लांबवली; दोघांविरोधात गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव येथून ५० हजार रुपये असलेली बॅग लांबवल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना शनिवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वा. कालावधीत घडली आहे. मोहम्मद रिजवाना बशीर आणि महमद गोरी (दोन्ही रा.जिल्हा वैशाली, बिहार) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मोहम्मद मंजर आलम (२६, रा.रवींद्रनगर कुवाबांव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार मोहम्मद आलम यांचे रहाटाघर येथे पंक्चर काढण्याचे दुकान असून दोन्ही संशयित त्यांच्याकडे हेल्पर म्हणून काम करतात. तसेच ते कामानिमित्त अधूनमधून मोहम्मद आलम यांच्या रवींद्रनगर येथील रुमवर वास्तव्याला असतात. शनिवारी सकाळी मोहम्मद आलम आपला दोन महिन्यांचा हप्ता चोला मंडल फायनान्स कंपनीमध्ये भरण्यासाठी ५० हजार रुपये बॅगमधून घेउन आले होते. ती बॅग त्यांनी रवींद्रनगर येथील रूमच्या खिळ्याला अडकवून ठेवलेली होती. तेव्हा संशयितही दुकानात जेवत होते. दरम्यान, शनिवारी रात्री आलम हे बाजारात गेले होते. ते रूमवर परतले असता त्यांना रूमला लॉक लावलेले दिसून आले. त्यांनी रुमचे लॉक तोडून रुममध्ये प्रवेश केला असता त्यांना खिळ्याला लावलेली बॅग चोरीस गेल्याचे समजले. आपली बॅग चोरीस गेल्याचे समजताच आलम यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलिस हवालदार गायकवाड करत आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:05 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here