राजापूर : कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत काहीसा सुरक्षित राहिलेला राजापूर तालुका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित झाला. कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत गेली आणि मृत्युचा आकडाही चढता राहिला. अपुऱ्या आरोग्य सेवा सुविधा आणि साधसामुग्री या परिस्थितीत या संकटाचा सामना कसा करायचा असा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर ठाकला होता. मात्र शहरासह ग्रामीण भागातील या कोरोना संकट काळात घेतलेली खबरदारी आणि नियमांचे केलेले काटेकोर पालन व प्रशासनाने केलेले सुयोग्य नियोजन आणि चांगली कामगिरी यामुळे कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतुनही आता राजापूर तालुका सावरत आहे. तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस कमी होत असून २२ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत तालुक्यात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे तालुक्यात सध्या केवळ १६ रूग्ण ॲक्टीव्ह असून राजापूर तालुक्याची वाटचाल पुन्हा एकदा कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:24 PM 26-Oct-21
