तायक्वांदो मॅट खेळाडूंसाठी उपयुक्त : गायकवाड

0

दापोली : शहरातील प्रभुआळी तायक्वांदो क्लबने आता नवीन मॅट आणली असून खेळाडूंसाठी ही उपयुक्त ठरेल. येथील खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळेल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष, माजी नगरसेवक व या क्लबचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी मॅटच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. शहरातील प्रभुआळी तायक्वांदो क्लब येथे नवीन मॅटचा लोकार्पण सोहळा उद्योजक अभय जैन यांच्या हस्ते नुकताच श्री राम मंदिराच्या सभागृहात पार पडला. तायक्वांदो क्लब प्रभुआळी हे प्रशिक्षण केंद्र गेल्या काही वर्षांपासून सुरू असन येथून अनेक विद्यार्थी स्व-रक्षणाचे धडे घेत आहेत. आताही खेळाडूंना या मॅटचा फायदा होणार आहे. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष नितीन साठे, अरविंद पुसाळकर, क्लबचे शिक्षक नदीम पठाण, ऋतिक सर, स्वप्निल येलवे आदी उपस्थित होते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:41 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here