सिल्वासा : देशात अनेकविध निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही ठिकाणी महानगरपालिका, विधानसभा निवडणुकात तर काही ठिकाणी लोकसभेच्या पोटनिवडणुसांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच आता खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. भाजप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला असून, शिवसेनेचा इतिहास पाहा, ते तिथे आहेत, तेच बरे आहे, असा टोला लगावला आहे.
शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनाच मैदानात उतरवण्यात आले आहे. तर भाजपकडून महेश गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक सभा घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर ५६ जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, अशी टीका फडणवीस यांनी केली.
मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? अशी विचारणा करत ते इथे आले तर नाव महाराजांचे घेतील आणि काम मुघलांचे करतील, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. आपले भवितव्य बदलण्यासाठीची ही संधी आहे. देशातील गरीब जनतेसाठी पंतप्रधान मोदींनी योजना केल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, दे मोदींनी देशात करुन दाखवले, असे कौतुकोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
4:06 PM 26-Oct-21
