नाणार संपलेला विषय आहे – खा. विनायक राऊत

0

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द झाला असून हा आता संपलेला विषय आहे, तसेच जे कोणी शिवसैनिक किंवा शिवसेनेचे पदाधिकारी नाणार प्रकल्पासाठी आग्रही असतील अश्यांवर पक्ष कारवाई करेल असा सज्जड दम शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. तसेच नाणार प्रकल्पाची दलाली करणारे शिवसैनिक नाहीत असेही राऊत म्हणाले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये नाणारची जाहिरात झळकल्याने सेनेवर टीकाही होत आहे. आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दुट्टपीपणाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. नाणार प्रकल्प रद्द झाला असून तो उकरून काढण्याचा मुद्दाच नाही. तसेच जे लोकं शिवसेनेचा बुरखा घालून नाणार प्रकल्पाची दालाली करत असतील ते शिवसैनिक नाहीत असेही राऊत यावेळी म्हणाले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here