“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पूर्ण विश्वास, सत्य समोर येईल तेव्हा ते सत्याचीच बाजू घेतील”

0

मुंबई : मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पण मला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत हेही सत्य आहे. नवाब मलिकांच्या आरोपांवर बोलण्याची मला काहीही गरज नाही. त्यांना खरंतर वेळच उत्तर देईल, असं प्रत्युत्तर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी दिलं होतं. त्यानंतर, त्यांनी ठाकरे कुटुंबीयांवर आणि ठाकरे सरकारवर माझा विश्वास असल्याचं म्हटलंय. माझा उद्धवजींवर विश्वास आहे, ठाकरे कुटुंबीय आणि महाराष्ट्र सरकारवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. माझा महाराष्ट्र सरकारवर विश्वास आहे, एक माणूस सरकारला इन्फ्लुन्स नाही करू शकत. कारण, काहीही झालं तरी सत्य वर येणार. त्यावेळी, आपले मुख्यमंत्री सत्याचीच बाजू घेणार, असे अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हटलंय. नवाब मलिक असं का वागतायंत ते मला कळत नाही, नवाब मलिक हे वैयक्तिक अजेंडा घेऊन विरोध करत असतील, यामागे अशी अनेक कारणं असू शकतात. मी समीर यांना एवढंच सांगितलंय की, तुम्ही तुमचं काम करा, कुणी काहीही आरोप करो, तुम्ही तुमचं काम करा, असे क्रांती रेडकर यांनी म्हटलंय.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:45 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here