मुंबई : राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पगार थांबवला आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याचीही राज्य सरकारकडून तयारी सुरु झाली असल्याचे वृत्त आहे. परमबीर सिंहांविरोधात मुंबई, ठाणेसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनंतर परमबीर सिंह यांना राज्य सरकार फरार घोषित करणार आहेत. पोलीस महासंचालकांनी परमबीर सिंह यांच्यासह 25 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निवेदन गृहमंत्रालयाला दिले आहे. मात्र गृह मंत्रालयाने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असलेल्या आरोप विस्तृत स्वरूपात देण्यास पोलीस महासंचालकांना सांगितलं आहे.
राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यानंतर आता परमबीर सिंह आणि इतर पोलिस अधिकारी ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना निलंबित करण्यात निवेदन पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला दिला आहे. गृह विभागाने मात्र सावध भूमिका घेत अधिकाऱ्यांवर असलेल्या आरोपांची विस्तृत माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागवली आहे.. किती गंभीर स्वरूपाचे आरोप संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आहेत याची माहिती गृहमंत्रालयाला हवी आहे ज्या नंतर यावर त्यांच्याकडून निर्णय घेण्यात येईल.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:14 PM 26-Oct-21
