मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. आर्यन खानच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे, या प्रतिज्ञापत्रामध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी त्याच्या बाजूने कोणताही व्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. हा सर्व राजकीय लोक आणि एनसीबीमधील मामला आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणीसाठी हायकोर्टात भारताचे माजी ऍटर्नी जनरल आणि जेष्ठ कायदेतज्ञ मुकूल रोहतगी कोर्टात पोहचले आणि रोहतगी आर्यनच्या जामिनासाठी युक्तिवाद करत आहेत. ज्यांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपांत पकडलं जात नाही, त्यांना अट्टल गुन्हेगारांप्रमाणे वागवणं चुकीचं आहे. NDPS कायद्यातही स्पष्ट केलंय की, ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांना सुधारण्याची संधी द्यायला हवी. त्यांना जेलऐवजी पुनर्वसन केंद्रात पाठवलं जातं असा युक्तिवाद रोहतगी यांनी हायकोर्टात केला आहे.
आर्यनला गोवण्यासाठी एनसीबीनं साल 2018 पासूनच्या व्हॉट्सऍपचा संदर्भ जोडला आहे. या चॅटमधून काहीही सिद्ध होत नाही एनसीबीसाठी तो महत्त्वाचा पुरावा असेल मात्र त्याचा या घटनेशी कुठेही संबंध लागत नाही. आपण तिथं जाऊ, हे खाऊ, ते पिऊ या गोष्टी पुरावा कसा मानता येतील? असं रोहतगी यांनी युक्तीवादात म्हटलं आहे. एनडीपीएस कायद्यात अमली पदार्थ्यांच्या मात्रेलाही महत्व आहे. आर्यनकडे तर काहीच सापडलेलं नाही. मग त्याच्यावर या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कायद्यानं आरोपीकडे अमली पदार्थ सापडणं गरजेचं असतं, दुस-याकडे काय सापडलं त्याचा माझ्याशी काय संबंध? असा युक्तिवाद आर्यनच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी केला. एका पंचाचा कर्मचारी असलेल्या दुसऱ्या पंचाने इथल्या एनसीबी प्रमुखांवर गंभीर केले आहेत. हे सर्व प्रकरण एका राजकिय नेत्याच्या जावयाशी संबंधित आहे. मात्र आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, आमची केस गुणवत्तेच्याच आधारावर जामीनास पात्र असल्याचं रोहतगी हायकोर्टात म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:27 PM 26-Oct-21
