दिवाळीनंतर टीव्ही, फ्रीज, एसीच्या किंमतीत वाढ होणार?

0

कोरोना महामारीमुळे देशावर आर्थिक संकट ओढावले आहे. देशात पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅससह अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली. दरम्यान, दिवाळीचा सणाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात नव्या वस्तूंची खेरदी केली जाते. मात्र, यावर्षी टीव्ही, फ्रिज किंवा एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, पुढील माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. दिवाळीनंतर टीव्ही, फ्रिज आणि एसीच्या किमंतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दिवाळीनंतर टीव्ही, फ्रिज आणि एसीसह इतर कंज्यूमर ड्युरेबल्स कंपनीच्या वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, मागील काही दिवसांपासून स्टील, कॉपर आणि एल्युमिनिअमच्या किंमतीत वाढ झाली. ज्यामुळे कंज्यूमर ड्युरेबल्स कंपनींसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीने आणखी भर घातली. डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने मालाची वाहतूकही महाग झाली आहे. त्यामुळे या कंपन्यांकडे दरवाढ करण्याशिवाय पर्याय उरला नाही. सेमीकंडक्टर चिपचा तुटवडाही या कंपन्यांना त्रासदायक ठरत आहे. या दिवाळीला अधिक विक्री होईल, या हेतूने कंज्यूमर ड्युरेबल्स कंपनींने त्यांच्या वस्तूच्या किमती वाढवल्या नव्हत्या. याचा कंपनींच्या नफ्यावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. यामुळे दिवाळीनंतर कंज्यूमर ड्युरेबल्स कंपन्यांच्या वस्तूंच्या किमतीत सात ते दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:27 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here