➡ गुहागर : शहरातील श्री वराती देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री वराती देवी प्रासादिक मंडळ गुहागर खालचापाट यांच्यातर्फे पंचरंगी जाखडी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. यात प्रथम क्रमांक नूतन ज्ञानेश्वर नृत्य पथक कीर्तनवाडी, द्वितीय क्रमांक कळमेश्वर नृत्य पथक जानवळे, तर तृतीय क्रमांक संत गोरोबा नृत्य पथक जामसूद यांनी पटकावले. या स्पर्धेतील उत्कृष्ट गायक सुयोग पानकर, उत्कृष्ट बँजो वादक सूरज मोहिते, उत्कृष्ट ढोलकीवादक यश पानकर, उत्कृष्ट संच सालबाई नृत्य पथक पाटपन्हाळे यांची निवड केली. मंडळाचे अध्यक्ष विवेक मोरे यांच्या मार्गदशनाखाली ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे ज्येष्ठ नागरिक दशरथ आरेकर यांच्या हस्ते झाले होते. विजेत्या स्पर्धकांना व इतरांना गौरविण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:42 PM 26-Oct-21
