‘गाव विकास समिती’चे वाढत्या महागाईविरोधात डिजिटल आंदोलन

0

रत्नागिरी : वाढत्या महागाईविरोधात आता नागरिकांनी मुक्तपणे बोलले पाहिजे, केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारला पाहिजे. रस्त्यावरील आंदोलनात प्रत्येकाला सहभाग शक्य होत नाही. मात्र आपण महागाई वाढल्याने ज्या अडचणी सोसत आहोत, त्या शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटत असते. हीच बाब लक्षात घेऊन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी महागाईविरोधी जनजागृती आंदोलनाची घोषणा केली आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या व्यस्त वेळेतील पाच मिनिटे वेळ काढून वाढत्या महागाईबाबत एक पोस्ट दररोज आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून ती सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आंदोलन गाव विकास समितीने पुकारले असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जनतेला आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीवसुद्धा या जनजागृती आंदोलन मधून करण्यात येणार आहे. हे आंदोलन सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू राहणार आहे. मुळात महागाई वाढत असताना सामान्य माणसाचा आवाज दडपला जात आहे. महागाईविरोधात लोकांमध्ये संताप आहे पण तो संघटित नाही. काही कारणाने अनेकांना रस्त्यावरील आंदोलनात उतरता येत नाही, या डिजिटल आंदोलनात कुणालाही रस्त्यावर उतरायचे नसून आपल्या मोबाइलचा उपयोग वाढत्या महागाईविरोधातील आवाज म्हणून करायचा आहे. कोरोनाचे संकट असताना ज्या समस्या मागील सात-आठ महिन्यात वाढत्या महागाईमुळे आपण सोसत आहोत, त्यांना वाचा फोडण्याचे सोशल मीडिया हे मोठे माध्यम आहे. केंद्र आणि राज्य सरकार वाढत्या महागाईपासून लक्ष विचलित करण्यासाठी रोज नवनवीन विषय पुढे आणेल. मात्र आपण सामान्य जनता म्हणून सरकारला वाढत्या महागाईचा जाब विचारत राहिले पाहिजे, असे मत सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे. लोकांचे उत्पन्न वाढलेले नसताना वाढलेली महागाई ही चिंतेची बाब असून सरकारने याबाबत ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. महागाई वाढत असताना सरकार म्हणून ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे त्या दोन्ही सरकारकडून होताना दिसत नाहीत. पेट्रोल ,डिझेल, सीएनजी आणि घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने जनतेत केंद्र सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने राज्य सरकारने त्याकडे लक्ष देणे अपेक्षित असताना त्याबाबतही लोकांची निराशा झाली आहे. नागरिकांनी त्यांच्या मनातील भावना सरकारला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवाव्यात व जनतेच्या मनातही वाढत्या महागाईमुळे आपल्यावर अन्याय होतोय ही जनजागृती व्हावी, या उद्देशाने महागाईविरोधी जनजागृती आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे खंडागळे यांनी सांगितले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:53 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here