रत्नागिरी : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भ्रष्टाचार निर्मूलनासंदर्भातील प्रतिज्ञा घेण्यात आली. देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. तो येत्या १ नोव्हेंबरपर्यंत साजरा केला जाणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन या सप्ताहाला आज रत्नागिरीत प्रारंभ झाला. या सप्ताहानिमित्त राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संदेशांचे वाचन यावेळी करण्यात आले. सर्वांनी भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताहाच्या नियमांचे आठवडाभर नव्हे, तर वर्षभर पालन करून पारदर्शक काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी भष्टाचार निर्मूलन सप्ताहात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. भ्रष्टाचार रोखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:57 PM 26-Oct-21
