शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवाला उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन घेऊन शिवसेना शाखा येथे भेट दिली. मसुरे आंगणेवाडी येथील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या लघु पाटबंधारे योजनेचा उद्घोषणा सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यासह शिवसेना पदाधिकारी व आंगणे कुटुंबीय यांची उपस्थिती.
